महाराष्ट्र ऐकून तेरा बोली भाषा बोलली जात्तात,बोलीभाषांपैकी प्रमुख एक असलेली बोलीभाषा म्हणजे अहिराणी.जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात.
मात्र, या अहिराणी भाषेलादेखील एक मोठी प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे. म्हणूनच अहिराणी हीदेखील एक स्वतंत्र भाषा म्हणून ओळखली जाते. आपल्याकडे दर बारा कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात. म्हणजेच तिथल्या संस्कृतीचा प्रभाव त्या त्या बोलीभाषेवर पडतो आणि बोलीभाषा बदलत जाते. याच बोलीभाषांतील एक म्हणजे अहिराणी. अहिराणी ही फक्त बोलीभाषा नसून ती एक संस्कृती आहे. एका विस्तीर्ण अशा प्रदेशाची ओळख आहे. इतकंच नव्हे तर एक स्वतंत्र लोकसाहित्य अहिराणी भाषेत तयार झालं आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात अहिराणी भाषा ही प्रामुख्याने बोलली जाते. नाशिक जिल्ह्यातील हे चार तालुके सोडले तर जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा भूभाग हा खान्देश म्हणून ओळखला जातो. म्हणून अहिराणी भाषेला खान्देशी भाषा असेदेखील म्हटले जाते.भाषेचा इतिहास
खान्देश या भूभागाचा प्रवास अतिशय प्राचीन काळापासून सुरू आला आहे. ऋषीकदेश, कंददेश, खांडदेश, खांडवदेश, खान्देश, कन्नदेश, अभिरदेश, अशा वेगवेगळ्या नावानं या प्रदेशाचा प्रवास चालू झाला. कोणी याला कान्हाचा देश म्हणून कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश म्हणतात. तर कोणी खानाच्या राजवटीवरुन खान्देश म्हणतात की, काननदेवावरुन खान्देश याचा अजून ठोस पुरावा नाही. याच खान्देशासह नाशिक जिल्ह्याचा कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, सुरगाणा आणि गुजरातमधील डांग जिल्ह्याचा काही भाग हा पूर्वी बागलाण प्रांत म्हणून ओळखला जायचा. या बागलाण प्रांतावर बागुल राजांचे राज्य होते. बागुल राज्यांच्या आधी येथे अभिरांची राजवट होती. तो कालावधी साधारण इ. स. 203 ते 416. हेच अभीर पुढे अहिर झाले. आणि याच अहिरांची भाषा म्हणून अहिराणी नावारुपास आली. खान्देशचा भूभाग म्हणजे पूर्वेला वाघूर नदी, पश्चिमेला चांदवडचे डोंगर, उत्तरेला सातपुडा पर्वत रांगा तर दक्षिणेला अजिंठ्याचे डोंगर. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अहिराणी ही प्राचीन भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर यांच्या ग्रंथांमध्ये देखील अहिराणी बोलीभाषेचा उल्लेख आणि शब्द आढळतात. अहिर हे गोपाळ, गुराखी, गुरे राखणारे. अहिरांचा नंद, गोपाळ म्हणून रामायण महाभारतातदेखील उल्लेख आढळतो. त्याचसोबत अनेक शिलालेखातून अहिराणी भाषेचे पुरावे मिळतात. इतर बोलीभाषेप्रमाणेच अहिराणीदेखील आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख जपून आहे. अहिराणी भाषेची गोडी ही खूप मधुर आहे. खान्देशातील प्रदेशानुसार या भाषेला बागलाणी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात.
अहिराणी संस्कृती
खान्देशातील अहिराणी संस्कृतीमध्ये होणारे पारंपरिक सण-उत्सव, लग्न समारंभ, कानबाई उत्सव, आखाजी (अक्षय्य तृतीय) यातून आपल्याला अहिराणी संस्कृतीचं दर्शन घडत जातं. यादरम्यान म्हटली जाणारी गाणी, जात्यावरच्या ओव्या, म्हणी ही खर्या अर्थाने अहिराणीची ओळख आहे. अहिराणी लोक घरात मुख्यत्वेकरून अहिराणी आणि घराबाहेर मराठी भाषेचा वापर करतात. शहरात स्थायिक झालेले अहिराणी भाषिक लोक गावी आल्यावर अहिराणीच बोलतात. किंवा शहरात आपल्या गावाकडील व्यक्ती भेटल्यावर अहिराणीत संवाद साधतात. ग्रामीण भागात मात्र, घराबरोबरच बाहेर देखील अहिराणी भाषाच बोलली जाते. 2001 च्या जनगणनेनुसार अहिराणी भाषा बोलणार्या लोकांची संख्या साधारण 19 लाखांच्या घरात होती. यावरुनच अहिराणी बोलणार्या लोकांची संख्या आजमितीस किती असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. तर मागेच झालेल्या साहित्य संमेलनात आयोजकांनी अहिराणी भाषा बोलणार्यांची संख्या ही आता 1 कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं. परदेशात गेलेले अहिराणी भाषिकदेखील अभिमानाने ही भाषा बोलतात.
मराठी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषा साहित्य संमेलन देखील होतं. पहिलं अहिराणी साहित्य संमेलन मांडळ ता. अमळनेर येथे 1998 ला पार पडलं होतं. त्यानंतर कासारे ता. साक्री, चाळीसगाव, नाशिक, धुळे त्याचबरोबर पुणे येथे देखील खान्देश मंडळातर्फे संमेलनं झाली आहेत. याचबरोबर चर्चासत्रे, मुलाखती, कवी संमेलन, नाटक, गाणे, सिनेमा आता अहिराणी भाषेची व्याप्ती वाढवत आहेत. यामुळे अहिराणी भाषा ही दिवसेंदिवस समृध्द होत आहे.
बोलीभाषेची खरी ओळख ही बहिणाबाई चौधरी यांनी करुन दिली. अगदी साध्या आणि सोप्या ओव्यांच्या माध्यमातून जीवनाचे सार बहिणाबाईंनी सांगितले आहे.
ओव्या
संसाराची सरळ व्याख्या या ओव्यांमधून आपल्याला समजते.याचबरोबर लग्न समारंभात म्हटली जाणारी गाणी ही अतिशय मधुर आणि गोड आहेत.
अंगणात खेळे बाळ कोणाचा लह्यरे
त्याच्या गं कमरेत साखळी दुह्यरे
अरेच्चा! सकाळी सकाळी हा कमरेला दुहेरी साखळी बांधलेला कोणाचा बाळ अंगणात खेळतोय? सारवलेल्या अंगणात बाळकृष्णासारखा दिसतोय...
शेजी घाले सडा, मन्हा सड्याला भिडूनीनादान हरी मन्हा, आला रांगोळी मोडोनीशेजारीण माझ्या सड्याला जोडुन सडा टाकतेय! मोठमोठे सडा टाकायचं किती ते कौतुक.... पण माझ्या नादान हरीने रांगोळी मोडली की!पह्यले गाऊ ओवी गं रामराया सजनालागाडीवर जाती, घुंगरु त्याच्या इंजनालापहिली ओवी गाऊ माझ्या धन्याची.. .. त्यांच्या गाडीच्या इंजनाला घुंगरु बांधलेत याचं कोण कौतुक!!पारोळ झालं जुनं, नाशिक जमाबंदीकोनी हौसानं बांधिली, आरधी मुंबै पान्यामंदीत्याकाळात आपल्या गावापेक्षा मोठं, स्वप्ननगरीसारखं शहर म्हणजे मुंबई आणि मुंबै बघणे म्हणजे जीवाची मुंबई करणे हे गावातल्या कित्येकांचं स्वप्न असायचं! धुळ्याजवळ असणारं पारोळा ही आता जुनं झालं इतकच काय नाशिक ही आता नको... ! पण मुंबई हे बेट होतं हे ही ह्या सासुरवाशिणीला माहितीये. म्हणुन ती म्हणतेय कोणी हौसेनं ही मुंबई अर्धी पाण्यात बांधलीय.काय पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बायागंगेची आंघोळ, दर्शनाला रामरायात्याकाळी, पिकनीक, ट्रीपा/ टुर असं काही नाहीच. तीर्थक्षेत्री जाऊन थोडंफार स्थलदर्शन व्हायच. इतकच. नाशिकच्या बायकांनी असं कोणतं पुण्य केलय की त्यांना रोज गंगेची(गोदावरी) आंघोळ आणि रामरायाचं दर्शन होतं. इथे आम्हाला वर्षातुन एकदा ही कोणी तीर्थक्षेत्री नेत नाही....काय पुण्य केल तुमी, नाशिकचे लोकगंगेची आंघोळ, दर्शनाला गायमुखनाशिकच्या लोकांचं ही पुण्य महान की त्यांना रोज गोमुखाचं दर्शन होतं!रामकुंडावरी ढवळ्या धोतराची जोडीआंघोळीला येती रामलक्ष्मणाची जोडीरामकुंडावरी ओल्या धोतराचा पिळाआंघोळीला येती साधुसंताचा मेळाआरध्या रात्री कोण चालला एवढ्या रातीमहादेव पार्वती हा कंदील डाव्या हातीमध्यरात्री १२ वाजले की शिव-पार्वतीचा फेरा येतो म्हणतात... आणि तेव्हा त्यांना जिथे दु:ख दिसेल तिथे ते दूर करतात असं म्हणतात.देवा रे महादेवा, काय बसला डोया लाईपृथमी ( पृथ्वी) ढुंढल्यानी जोडी मारुतीला न्हाईअरे महादेवा, भोळ्या शंकरा असा डोळे मिटुन काय बसलायस? आख्ख्या पृथ्वीवर मारुतीला जोडी नाही काय?भोळा रे शंकर, भोळं तुझं घेण देणतुझ्या बेलामधे मला सापडल सोनंराम-लक्ष्मण नि ही तिसरी सिताबाईपृथमीमधे जोडा मारुतिला न्हाईराम सितामाई ही कुटुंबवत्सल जोडी! जिथे रामाने एकीकडे भावाला (लक्ष्मणाला) ही बरोबर ठेवले एकीकडे पत्नीलाही तेवढाच दर्जा दिला. पण आख्ख्या पृथ्वीवर बिचार्या मारुतीला जोडी सापडली नाही. तो ब्रम्हचारीच राहिला.सर्वच बाबतीत समृद्ध अशा या अहिराणी बोलीभाषा आणि संस्कृतीचा एक भाग असल्याचा मनापासून अभिमान वाटतो. म्हणूनच म्हणावंस वाटतं की, मना गाव, मना देश, खान्देश…